दिव्यांग विद्यार्थ्याना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहीजे : नगराध्यक्षा योगिता पिपरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
दिव्यांग विद्यार्थ्याकडे कलुषीत भावनेने न पाहता त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. दिव्यांग विद्यार्थ्याना चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करून मोठ्या पदावर कार्य करण्यास सहाय्य करणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्याना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहीजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
बोदली येथील कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयात महिला आघाडी बचत गटाच्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या.  बचत गटाच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते दिव्यांग विद्यार्थ्याना राखी बांधुन रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आले. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली न.प.च्या नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा चौधरी, दुर्गाताई मंगर, माजी नगरसेविका वर्षाताई शेडमाके, कोमल बारसागडे, पठाणताई, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याध्यापक जोशी उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्याना लहान-लहान कार्यक्रमांमधून आनंद मिळत असतो. त्यांना प्रेमाने समजून घेवून मुलांप्रमाणे जिव्हाळा निर्माण करणे आवश्यक  असते. दिव्यांग विद्यार्थी सुप्त गुणांने परिपूर्ण असतात. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखणे आणि त्यांना प्रतिष्ठेच्या पदावर पोहोचविणे शिक्षक, पालक तथा आपले कर्तव्य आहे, असे नगराध्यक्षा योगिता पिपरे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जोशी यांनी केले. संचालन शंकरपूरे तर आभार टाकसाळे यांनी मानले. यावेळी कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयातील ६० विद्यार्थ्याना राखी बांधून खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिल्लरवार, शिंदे, म्हस्के, जयपुरकर, देशमुख, आष्टेकर, सुरेशकर, बोधनकर, खापर्डे, भोंगळे यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक व नागरिक उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-18


Related Photos