देसाईगंज येथील अंशु जेजानीने सिएच्या परिक्षेत मिळवले अभुतपूर्व यश


- सिएची परिक्षा उत्तीर्ण करणारी गडचिरोली जिल्ह्यातील पहिली विद्यार्थीनी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
शहरातील प्रसिद्ध उद्योगपती देविदत्त जेजानी यांची नात तथा एमआरएफ शोरुमचे संचालक विनोद जेजानी यांची मुलगी अंशु हिने सिएचीपरिक्षा उत्तम श्रेणीतपास करून अभुतपूर्व यश मिळवले आहे. 
चाटर्ड अकांउटंट या अंतीम वर्षांच्या नुकत्याच लागलेल्या निकालात अंशु ही उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाली असुन ही परिक्षा पास करणारी ती गडचिरोली जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थीनी असल्याचे सांगितल्या जात आहे. 
अंशु जेजानी ही जी. एस. काॅमर्स महाविद्यालय नागपुरची विद्यार्थीनी असुन तिने बारावीमध्येही या महाविद्यालयातुन ८९. २ % गुण प्राप्त करून काॅमर्स या विषयात बारावीमध्येही  प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने मिळवलेल्या या अभुतपूर्व यशाने गडचिरोली जिल्ह्याच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवल्या गेला असुन तिने मिळवलेल्या अभुतपूर्व यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. 
आपल्या यशाचे श्रेय तिने आजी -आजोबा, आई - वडील, कुटुंबीय व शिक्षकांना दिले आहे. आई-वडिल व गुरुजनांच्या आशिर्वादामुळेच आपण हे यश संपादन करू शकले असल्याची माहिती तिने प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-17


Related Photos