बोपाबोडी येथे पशुचिकित्सावर मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : 
रिलायन्स फाउंडेशन गोंदिया यांच्या सयुंक्त विद्यमानाने  आज १७ ऑगस्ट  रोजी बोपाबोडी ता. सडक अर्जुनी  येथे पशुपालकांसाठी  पशुचिकित्सावर  जीओ चाट व्हरचुअल कॅम्प च्या सहाय्याने मार्गदर्शन  करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशन चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी धम्मदीप गोंडाने  व  जिल्हा प्रतिनिधी राहुल मेश्राम यांनी केले. रिलायन्स फाउंडेशन चे जिल्हा प्रतिनिधी राहुल मेश्राम यांनी  पशुपालकांना रिलायन्स फाउंडेशनच्या विविध सेवांबद्दल माहिती दिली.
सदर कार्यक्रमात पशुचिकित्सावर मार्गदर्शन करण्यासाठी  डॉ. शरद जोशी  हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी जीओ चाट व्हरचुअल कॅम्प च्या माध्यमातुन पशुपालकाना त्यांच्या जनावराबाबत लसीकरण , आहार , शेळीचे आजार व बैल , म्हैस व गाईचे आजार व दूध उत्पादन , तसेच पावसाळ्यात त्यांचे नियोजन कसे करावे याविषयी सखोल  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात  परसोडी  येथे २२ पशुपालक उपस्थित होते.
बोपाबोडी येथील सुनंदा कापगते व  विजय कापगते यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या या जीओ चाट व्हरचुअल कॅम्प कार्यक्रमाची स्तुती करून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतर पशुपालकांना याचा नक्कीच लाभ होईल असे सांगितले.
  Print


News - Gondia | Posted : 2019-08-17


Related Photos