सोमवारी अनुकंपा उमेदवारांची दस्तऐवज तपासणी, उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अनुकंपा तत्वावर प्रत्यक्षात उपलब्ध रीक्त पदांवर नियुक्ती संबंधाने पात्र ठरविण्यासाठी सोमवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात शैक्षणिक अर्हता व सर्व दस्तऐवज तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी पूर्ण प्रकरण असलेल्या केवळ १४० उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर वर्ग ३, वर्ग ४ च्या पदावर नियुक्ती देण्याबाबत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने ८ फेब्रुवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार संभाव्य नियुक्तीकरीता माहिती पूर्ण असलेल्या १४० उमेदवारांच्या प्रकरणाची १ जानेवारी २०१८ ची अंतीम यादी पंचायत समितीच्या सुचना फलकावर तसेच सबंधित पं.स.च्या सबंधित आस्थापनेकडे व जिल्हा परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
शैक्षणिक अर्हता व इतर सर्व दस्तऐवज, जिल्हा परिषदेला सादर केलेल्या दस्तऐवजांच्या दुय्यम प्रती, जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी शैक्षणिक अर्हता वाढविण्यास किंवा इतर कारणास्तव केलेल्या अर्जाचे तसेच जिल्हा परिषदेने १ जानेवारी २०१८ रोजी प्रसिध्द केलेल्या तात्पुरत्या यादीवर घेतलेल्या आक्षेप अर्जाचे जिल्हा परिषदेच्या आवक शाखेकडून पोच प्राप्त झाल्याच्या प्रतीसह व त्यासोबत सादर केलेल्या दस्तऐवजासह उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. सबंधित उमेदवारांनी स्वतः व्यक्तीशः उपस्थित न झाल्यास भविष्यात सबंधित उमेदवाराची कोणतीही तक्रार , विनंती स्वीकारल्या जाणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-17


Related Photos