एटापल्ली तालुक्यातील नागरीकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / एटापल्ली :
अनेकदा निवेदने देउनही मागण्या निकाली काढल्या जात नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील नागरीकांनी काल १६  ऑगस्ट पासून एटापल्ली येथील बसस्थानकाजवळ ठिया आंदोलन सुरू केले. शाळा, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच नागरिकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
गट्टा, जारावंडी व इतर तालुक्यांच्या निर्मितीसह अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, जि.प. हायस्कूल एटापल्ली येथे कनिष्ठ व वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात यावे, एटापल्ली येथील बंद केलेले माॅडेल स्कूल सुरू करण्यात यावे, एटापल्ली ते आलापल्ली मार्ग चौपदरी करण्यात यावा, गट्टा, जारावंडी सह सर्व रस्ते व पुलांची दुरूस्ती करण्यात यावी, सर्व कर व अधिभार कमी करून विज बिल निम्मे करण्यात यावे, विजेसबंधी सर्व समस्यांचे निराकरण करावे, बिएसएनएल सेवेची क्षमता व दर्जा सुधारण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद देवतळे, विलास चिटमलवार, सुरेश बारसागडे, महेश पुल्लूरवार, आरीफ शेख, रच्चावार, सचिन मोतकुरवार यांनी केले. आंदोलनात शेकडो नागरीक सहभागी झाले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-17


Related Photos