महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : रत्नापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : रमाबाई महिला मंडळ, बौद्ध समाज रत्नापुर, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन रत्नापूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून मिरवणूकीला सुरवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची गावामधून विविध घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत अनेक महिला सावित्रीच्या वेषभूषेत सहभागी झाल्या होत्या.

मिरवणूक परत पोहोचल्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कृपाली धारणे, तर प्रमुख अतिथी म्हणून मिनघरी सरपंच शुभांगी आत्राम, माजी सरपंच सदाशिव मेश्राम, बौद्ध समाजाचे सचिव रंजित, सीताराम मेश्राम, वासुदेव दडमल, शालू मेश्राम, धीरज मेश्राम व इतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरानी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता दिलीप मेश्राम, संचालन वैशाली मेश्राम, तर आभार निरंजना मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक-उपासिका, गावातील महिला -पुरुष मोट्या प्रमाणात उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos