महत्वाच्या बातम्या

 RTMNU विद्यापीठातील दोन शिक्षकांना महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून मान्यता 


- डॉ. दादासाहेब कोकरे व डॉ. प्रशांत गाडे यांचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ शिक्षकांना महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून मान्यता  प्रदान केली आहे. औषधी निर्माण शास्त्र विभागातील डॉ. दादासाहेब कोकरे आणि भौतिकशास्त्र विभागातील डॉ. प्रशांत गाडे यांचा यात समावेश आहे. एमआयटी पीस विद्यापीठ पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात फेलो पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेस ही महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. १९७६ मध्ये राज्याला भेडसावणार्‍या वैज्ञानिक आणि तांत्रिक समस्यांवर प्रकाश टाकणे आणि आवश्यक ती पावले उचलण्याची शिफारस करणे या विशिष्ट उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून अकॅडमी मध्ये याबाबत विस्तृत चर्चा केली जाते. प्रतिष्ठित शास्त्रज्ञांना या संस्थेकडून फेलो म्हणून मान्यता प्रदान केली जाते. औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. दादासाहेब कोकरे यांचे औषधांचा प्राण्यांच्या मेंदूवर होणारा परिणाम या विषयावर संशोधनात मोठे योगदान आहे.

प्राण्यांच्या मेंदूवर औषधांचा होणारा परिणाम याचा अभ्यास करीत मानवी मेंदूच्या आजारावरील औषधी निर्माण क्षेत्रात डॉ. कोकरे यांच्याकडून संशोधन केले जात आहे. त्याचप्रमाणे भौतिकशास्त्र विभागातील डॉ. प्रशांत गाडे यांचे सैद्धांतिक आणि संगणकीय भौतिकशास्त्र क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन कार्य आहे. या विषयातील संशोधन कार्यात दिलेल्या योगदानाबाबत डॉ. कोकरे व डॉ. गाडे यांचा फेलो म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, औषधी निर्माण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रमोद खेडेकर व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांनी दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos