महत्वाच्या बातम्या

 रविकांत कामतवार यांना वास्तुविशारद पदवी प्रदान 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे, महाराष्ट्र आयोजित वास्तू विशारद या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन रविकांत शिवशंकर कामतवार सिंदेवाही यांनी तो यशस्वीरित्या पूर्ण केला असून संस्थेकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये द्वितीय श्रेणीत वास्तू विशारद हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना संस्थेकडून वास्तू विशारद प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या सुप्रसिद्ध अध्यात्मिक एवं ज्योतिष लेखिका गुरुश्री प्रिया मालवणकर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्योतिष शलाका जयश्री बेलसरे, तसेच फल ज्योतिष संस्थेचे विजय जकातदार व प्रसिद्ध लेखक बबन पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते वास्तुविशारद व अंकविशारद च्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्रे देण्यात आली. 

यावेळी संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती, वास्तूभूषण, डॉ. उमेश रमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. लोकनाम हितकाम्यया या तत्त्वावर आधारित संस्थेकडून प्रत्येक घरात वास्तूशास्त्र पोहचवण्याच्या हेतूने हे अभ्यासक्रम आयोजित केले जात असून प्राचीन वास्तुशास्त्र घरा घरा पर्यंत पोहोचवावे हाच मुख्य उद्देश आहे असे मत व्यक्त केले.

विशेष म्हणजे रविकांत शिवशंकर कामतवार हे सर्टिफाईड न्यूमेरोलॉजिस्ट असून ते मागील १० वर्षापासून लोकांना मदत करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos