सतत गैरहजर राहणाऱ्या अहेरी पं.स.च्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा : अजय कंकडालवार


-  विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याबाबत माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. गट विकास अधिकारीच गैरहजर राहत असल्यामुळे अनेक कामे रखडलेली आहेत. यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त तसेच जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गटविकास अधिकारी गैरहजर राहत असल्यामुळे पं.स. मधील कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पंचायत समिती अंतर्गत सर्व योजनांचे काम रखडलेले आहे. वारंवार वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगुणसुध्दा गटविकास अधिकारी गैरहजर राहतात. यामुळे योजनांची कामे होवुनसुध्दा रक्कम मिळत नाही. यामुळे लाभार्थी आल्यापावली परत जातात. यामुळे चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos