गडचिरोली नगर परिषदेत ध्वजारोहणाची तयारी जोरात, पाण्यामुळे बसलेला गाळ काढला धुवून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
उद्या १५ ऑगस्ट रोजी देशाचा ७२ वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. यासाठी सर्वत्र उत्साहात तयारी सुरू आहे. गडचिरोली नगर परिषदेतही कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.
काल आलेल्या जोरदार पावसामुळे नगर परिषदेच्या आवारात तळे साचले होते. आज पाणी ओसरले. मात्र मैदानात प्रचंड गाळ साचला होता. हा गाळ काढण्यासाठी न.प. कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर मोहिम हाती घेतली. इंजिनच्या सहाय्याने उर्वरीत पाणी काढण्यात आले. यानंतर अग्नीशमन वाहनांच्या सहाय्याने जोराने पाण्याचा मारा करून गाळ काढण्यात आला आहे. संपूर्ण मैदानाची साफसफाई करण्यात आली. तोरणे बांधण्यात आले आहेत. उद्या सकाळी ध्वजारोहणासाठी विविध शाळांचे विद्यार्थी नगर परिषदेच्या आवारात गोळा होणार आहेत. यामुळे मैदान स्वच्छ करून ठेवण्यात आले आहे. रात्री पुन्हा पाउस आल्यास पावसाचे पाणी गोळा होउ शकते. मात्र आज स्वच्छता करण्यात आलेली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos