महत्वाच्या बातम्या

 पोलीस रेझिंग डे निमित्य माजी सैनिकांसाठी सभेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : माजी सैनिकांच्या ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पोलीस बहुदेशिय हॉल,पोलिस हेडक्वार्टर भंडारा येथे जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतांनी यांचे अध्यक्षतेखाली Police Raising Day चे औचित्यांने जिल्हयातील माजी सैनिकांच्या जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या Police Raising Day कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांना सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड व इतर विषयावर मार्गदर्शन देण्यात येईल. तसेच माजी सैनिकांचे सैन्य सेवेमधील अनुभव त्याचप्रमाणे सैन्य सेवेदरम्यान उत्कृष्ठ कामगीरी केलेल्या माजी सैनिकांच्या सत्कार होणार आहे.

तरी जिल्हयातील जास्तीत जास्त संख्याने माजी सैनिक सैनिकांनी Police Raising Day कार्यक्रमा मध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, आकाश अवतारे यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos