भामरागडमध्ये पुन्हा शिरले पाणी, नागरीकांना सतर्कतेचा ईशारा


- भ्रमणध्वनी सेवा ठप्प 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
मागील १५ ते २० दिवसांपासून तब्बल तिसऱ्यांदा  भामरागडला पुराचा फटका बसला असून काल १३ ऑगस्टपासून पुन्हा भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून तब्बल ४ ते ५ फुट पाणी वाहत असून भामरागडध्ये मुख्य चौकापर्यंत पाणी पोहचले आहे.
आज काही नागरीकांची घरे तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणी वेगाने वाढत आहे. भामरागड मधील मोबाईल सेवासुध्दा खंडीत झाली आहे. पुलाच्या आधाराने भामरागडपर्यंत नेण्यात आलेले केबल पुरामुळे तुटले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणी वाढत असल्यामुळे आणखी भामरागड वासीयांना त्रास सहन करावा लागणार आहे. सलग सुट्ट्यामुळे बाहेर गेलेले काही कर्मचारीसुध्दा अडकून पडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos