कठाणी नदीवरील जुन्या पुलाजवळील रस्ता गेला वाहून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - नागपूर मार्गावरील कठाणी नदीवरील जुन्या पुलावरून वाहतूक बंद झाली आहे. काही छोटी वाहने या पुलावरून ये - जा करीत होती. मात्र काल आलेल्या पुरामुळे या पुलाजवळील रस्ता उखडून गेला आहे. यामुळे या पुलावरून वाहतूक पूर्णतः बंद होणार आहे.
कठाणी नदीवरील जुना पुल जिर्ण झाला होता. शिवाय या पुलाची उंची अत्यंत कमी होती. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गडचिरोली - नागपूर मार्ग बंद पडत होता. यामुळे या ठिकाणी नवीन उंच पुलाची निर्मिती करण्यात आली. मागील काही महिन्यांपूर्वीच या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. या उंच पुलामुळे नागपूर मार्ग बंद पडण्याची समस्या दूर झाली आहे. काल १३ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते उखडून गेले आहेत. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos