हुंडा कमी दिला म्हणून सासरच्यांनी नववधूच्या तोंडात ओतले ॲसिड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  उत्तर प्रदेश : 
उत्तर प्रदेशमधील बरेलीत एका २१ वर्षीय विवाहित तरुणीची हुंडा कमी दिला म्हणून सासरच्यांनी निघृणपणे हत्या केली आहे. यशोदा देवी असे त्या तरुणीचे नाव असून तिच्या तोंडात ॲसिड ओतून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर यशोदाच्या सासरची सर्व मंडळी फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहे. यशोदाचा बरेलीतील बहेडी भागात राहणाऱ्या ओमकारसोबत १७ फेब्रुवारी २०१९ ला विवाह झाला होता. तिच्या लग्नाच्यावेळी तिच्या माहेरच्यांनी तिला हुंडा दिला होता. मात्र सासरच्यांना तो हुंडा कमी वाटल्याने त्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली व माहेरहून अधिक हुंडा घेऊन ये असे सांगितले. बहिणीवर होणारे अत्याचार थांबावेत म्हणून यशोदाचा भाऊ मनीष याने आणखी वीस हजार रुपये दिले. मात्र तेवढ्यावरही ओमकार व तिच्या कुटुंबीयांची हाव कमी झाली नाही. त्यांनी पुन्हा यशोदाला त्रास द्यायला सुरुवात केली.
सोमवारी यशोदाने घाबरलेल्या अवस्थेत तिच्या वडिलांना फोन केला व तिचे सासरचे तिला मारहाण करून जबरदस्ती काहीतरी पाजत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचे वडील व भाऊ तत्काळ बहेडी पोलीस ठाण्यात गेले व ओमकार विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले तेव्हा यशोदा बेशुद्धावस्थेत पडलेली होती व तिची जीभ व ओढ भाजलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.



  Print






News - Rajy | Posted : 2019-08-14






Related Photos