महत्वाच्या बातम्या

 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील धनुर्धर याला दोन सुवर्ण पदकप्राप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : बी.ए प्रथम वर्ष विद्यार्थी सुरेंद्र आग्रे यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली धनुर्विद्या संघात निवड झाली व त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे व गोंडवाना विद्यापीठाचे नावलौकिक करत गुरु काशी विद्यापीठ भटिंडा (पंजाब) येथे १९ ते २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या वेस्ट झोन धनुर्विद्या स्पर्धांमध्ये इंडियन खेळ प्रकारामध्ये ३० मी.एक सुवर्ण व ओवर ऑल मध्ये एक सुवर्णपदक पटकावले आहे. 

एकदरीत दोन सुवर्णपदक प्राप्त करून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी तथा गडचिरोली वासियांसाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. विद्यापीठ व महाविद्यालयाचे नावलौकिक केल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय फुलझेले महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी तसेच वन वैभव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय बबलू भैय्या हकीम तसेच  शाहीनभाभी हकीम यांनी सुद्धा सुरेंद्र यांचे अभिनंदन करून कौतुक केले व त्याला आशीर्वाद दिला. व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत सत्कार व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्राप्त झालेल्या या यशाचे श्रेय आई वडील व डॉ. श्याम कोरडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी यांना दिले आहे. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुरेंद्र ला खूप खूप अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक सुशील अवसरमोल, रोशन सोळंके, कौमुदी श्रीरामवार, नितेश डोके, पूजा डोर्लिकर यांनी सुद्धा त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. वरील सर्वांनी सुरेंद्र वर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे व भविष्यासाठी तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos