महत्वाच्या बातम्या

  ०७ जानेवारी २०२४ ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन


- माजी शिक्षक आमदार व्ही.यु.डायगव्हाणे व शिक्षक आमदार सुधाकर अडबाले राहणार उपस्थित 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : गडचिरोली विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोलीचे वार्षीक अधिवेशन रविवार ०७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता पासून कुथे पाटील विद्यालय, गोठणगाव ता. कुरखेडा येथे संपन्न होत आहे. 

सदर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक आमदार तथा माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष व्ही.यु. डायगव्हाणे तसेच उद्घाटक म्हणून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले उपस्थित राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून, अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य, योगराज पाटील कुथे माझी प्राचार्य तथा संस्थापक सरस्वती शिक्षण प्रसारण मंडळ गडचिरोली, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे अध्यक्ष दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली, जयंत यलमुले सचिव गडचिरोली जिल्हा संस्था चालक संघ, डॉक्टर अशोक गव्हाणकर महासचिव विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन ,मनीष शेट्टी अध्यक्ष गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघ उपस्थित राहणार आहेत.

सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जून पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणे, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना १०,२०,३० वर्ष सेवेनंतरची आश्वासीत प्रगती वेतन योजना लागू करणे, विनाअनुदातीत व अंशतः अनुदानीत तुकड्यांना शंभर टक्के अनुदान मंजूर करणे, सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, इयत्ता ६ ते ८ वर्गाला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना हायस्कुलची वेतन श्रेणी लागू करणे, शिक्षकांना अशैक्षणीक कामातून मुक्त करण्यात यावे. यासह शिक्षण क्षेत्रातील पंचविस ज्वलत विषयांवर सदर अधिवेशनात चर्चा करुन ठराव पारीत करण्यात येणार आहे. तसेच या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या विषयाबाबतही विस्तृत माहिती मिळणार आहे. 

सदर अधिवेशनात सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाचे कार्यवाह अजय लोंढे, जिल्ह्याध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्याध्यक्ष कैलास भोयर ,नरेंद्र भोयर, संजय दौरेवार, सुरज हेमके, आदींनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos