सचिन तेंडुलकरची पुरग्रसतांना मदत : ट्विटर द्वारे दिली माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराने हाहाकार माजला. तसेच कोकण, नंदूरबार, नाशिक या ठिकाणीही पूरस्थिती पाहायला मिळाली. अनेक जण  बेघर झालेत. तसेच देशातही अनेक राज्यांत पुराचा कहर पाहायला मिळाला. कर्नाटक, गुजरात, केरळ, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये पुराने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत पुरामुळे आतापर्यंत २२५ जणांचा बळी गेला आहे. पुरामुळे झालेले नुकसान कसे भरुन काढायची याची चिंता आहे. याच पार्श्वभूमीवर भारत रत्न सचिन तेंडुलकर पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे. मी पुरग्रस्तांना मदत केली आहे. तुम्हीही करा, असे ट्विट करत मदत केल्याची माहिती दिली.
देशात अनेक राज्यांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे, संसास वाहून गेलीत. अनेक जण बेघर झाले आहेत. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था मदत करत आहेत. ग्रामस्थ, महिला यांनी पुढाकार घेऊन मदत कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. काही कलाकारांनी आपल्यापरिने मदत केली आहे. क्रिकेटपट्टूही मदत करत आहेत. आता सचिन तेंडुलकरने  पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली आहे. मी मदत केली. तुम्हीही पूरग्रस्तांना मदत करा आणि पाठिंबा द्या, असे ट्विट सचिनने केले आहे. या ट्विटबरोबर त्याने पुराचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.  Print


News - World | Posted : 2019-08-14


Related Photos