महत्वाच्या बातम्या

 समाजकार्य महाविद्यालयात विश्वशांती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : २ जानेवारी २०२४ ला श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथील सांस्कृतिक विभागाअंतर्गत श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था, जन शिक्षण संस्थान गडचिरोली व फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने विश्वशांती मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. 

या कार्यशाळे दरम्यान सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत समारंभ आटोपून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.

या कार्यशाळेचे अध्यक्ष गांधी विचारक एकता परिषदेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय गांधी विचारक राजगोपाल पी.व्ही. यांनी समाज सेवा आणि समाज सुधार यातील फरक समजावून समाज कार्यकर्त्यांनी समाजातील वाईट गोष्टीला बदलवून समाज कसा सुधारायचा आणि त्याद्वारे देशाला कशाप्रकारे महान बनवायचे यावर अनमोल असे मार्गदर्शन या कार्यशाळे मार्फत करण्यात आले. 

कार्यशाळेच्या उद्घाटक जिल कार हेरीस, (कॅनडा) जय जगत फाउंडेशन च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक यांनी एजन्सी, समुदाय आणि अहिंसा या माध्यमातून समाजकार्य कसे करायचे त्याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तर जनशिक्षण संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष विजय बाहेरकर यांनी डॉ. राजगोपाल पी.व्ही. यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तसेच आजच्या कार्यशाळेला लाभलेले प्रमुख अतिथी संतोष सिरोहा, प्राचार्य डॉ.एस.के. खंगार, सिताराम सोनवानी, डॉ. सत्यप्रकाश  महेरा, यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या दरम्यान विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तर सत्र सुद्धा पार पडले आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे मार्गदर्शनाद्वारे समाधान करण्यात आले.

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन जन शिक्षण संस्थांन गडचिरोली चे गजानन अलोने व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. यादवराव गहाने यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग सहाप्रमुख डॉ. कविता ऊईके यांनी मानले.

या कार्यशाळेला श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था व जन शिक्षण संस्थान गडचिरोली येथील कार्यशाळेचे संयोजक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos