फरिदाबाद येथील पोलिस उपायुक्तांची स्वत:वर 'गोळी' झाडून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  छत्तीसगड  : 
छत्तीसगडमध्ये फरिदाबाद येथील पोलिस उपायुक्त (DCP) विक्रम कपूर यांनी आत्महत्त्या केली आहे. आयपीएस विक्रम कपूर हे फरिदाबादचे पोलिस उपायुक्त असून त्यांनी राहत्या घरी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
विक्रम कपूर यांची सर्विस रिवाल्वरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. विक्रम कपूर यांनी हे गंभीर पाऊल का उचलेले याच्या बद्दल अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतू या धक्कादायक घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

 
  Print


News - World | Posted : 2019-08-14


Related Photos