महत्वाच्या बातम्या

 जि.प. केंद्र शाळा कुनघाडा (रै.) येथे बालिका दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा कुनघाडा (रै.) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता शेंडे या तर प्रमुख अतिथी म्हणून विषय शिक्षक प्रमोद बोरसरे जेष्ठ शिक्षिका अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्गे गुरुदास सोनटक्के विजय दुधबावरे अभिषेक लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांची सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित भाषणे झाली. उत्कृष्ठ भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 

याप्रसंगी विषय शिक्षक प्रमोद बोरसरे यांनी भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका शेंडे यांनी यानिमित्याने सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुधबावरे यांनी संचालन जागृत संदीप कुनघाडकर याविद्यार्थ्याने तर आभार हार्दीक श्रीकृष्णा भांडेकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुरक आणि पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल वडेट्टीवार यांनी सहकार्य केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos