महत्वाच्या बातम्या

 ५ आणि ६ जानेवारीला स्व. बालाजी पाटील बोरकर स्मृती सोहळा


- पद्मश्री डॉ. खुणे होणार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : थोर समाजसेवी तथा भारतीय शिक्षण संस्था नवरगाव चे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर यांच्या स्मरणार्थ होणारा स्मृती सोहळा यावर्षी ५ आणि ६ जानेवारी २०२४ ला विविध कार्यक्रमानी साजरा होत आहे. ५ जानेवारी ला दुपारी १२ वाजता उदघानन सोहळा पार पडेल. 

नाट्यकलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे हे उदघाट्न सोहळ्याचे अध्यक्ष पद भूषवतील तर मूळचे चंद्ररपूरचे आणि हल्ली दिल्ली विद्यापीठ दिल्लीला प्राध्यापक असलेले प्रा. डॉ. प्रशांत आर्वे हे स्मृतिसोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी संस्थेचे माजी विद्यार्थी तथा सुप्रसिद्ध नाट्यकलावंत पद्मश्री डॉ. परशुराम  कोमाजी खुणे यांना यावर्षीच्या स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता अकोल्याचे जेष्ठ रंगकर्मी ड. रमेश थोरात यांचा बकरी शेर खा गयी हा  समजप्रबोधनात्मक एकपात्री कार्यक्रम, आणि रात्री ८ वाजता प्रा. डॉ. दिलीप अलोणे वणी यांचा हसा आणि लठ्ठ व्हा! ह्या नकलांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता शालेय विध्यार्थ्यांसाठी तारे जमी पर ही बालचित्रकला स्पर्धा, ९ वाजता महाविद्यालयीन विदयार्थ्यांसाठी आत्मभान नावाची स्पर्धा परीक्षा आणि दुपारी १२ वाजता संस्थेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांचे समूह नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत.

त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता स्मृती सोहळ्याचा समारोप पुण्याचे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या मित्र वणव्यामधे गारव्या सारखा यांच्या काव्य संध्येने होणार आहे. या सर्वच कार्यक्रमांना जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाधिकारी मुख्याध्यापिका सौ. शैवाली वैध तसेच संस्थेचे अध्यक्ष जयंतराव बोरकर आणि सचिव सदानंद बोरकर यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos