भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना 'वीर चक्र' पुरस्कार जाहीर


- उद्या स्वातंत्र्यदिनी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येईल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणं यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनंदन यांनी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचं एफ १६ हे लढाऊ विमान पाडलं होतं. स्वातंत्र्यदिनी हा पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर अभिनंदन यांनी सीमेवर मिग २१ बायसनद्वारे पाकिस्तानचं अत्याधुनिक एफ १६ हे विमान पाडलं होतं. अभिनंदन यांच्या या साहसाचं सर्व स्तरांतून कौतुक झालं होतं. मिग २१ च्या तुलनेत पाकिस्तानचं एफ १६ हे लढाऊ विमान अत्याधुनिक आणि अधिक शक्तिशाली होतं. पाकिस्तानशी लढताना अभिनंदन यांचं विमानही कोसळलं होतं. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. पाकिस्तानी सैन्यानं त्यांना कैद केलं होतं. त्यांची सुटका करण्यास पाकिस्तानला भाग पाडलं होतं. 
अभिनंदन यांच्या व्यतिरिक्त स्क्वॉड्रन लीडर मिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मिंती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
  Print


News - World | Posted : 2019-08-14


Related Photos