आष्टीतील १२ कराटे खेडाळूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
नँशनल शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि डिस्ट्रिक्ट कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ री राज्य स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा चंद्रपूर येथील राजीव गांधी सभागृहात नूकतेच पार पडले.
सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून  जवळपास ६०० स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याकडून आष्टी येथील १६ कराटे खेडाळूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी  १२ कराटे खेडाळू आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेत ३ गोल्ड मेडल ६ सिल्वर मेडल ३ ब्रांझ मेडल प्राप्त केले . सर्व विजयी खेडाळू ची  डिसेंबर महिन्यात नागपूर ला होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धसाठी निवड झालेली आहे .
विजयी खेडाळूं हे आष्टी येथील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा , महात्मा ज्योतिबा फुले हाय स्कूल , राजे धर्मराव हाय स्कूल येथे शिक्षण घेत आहेत . आपल्या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक कपिल मसराम , शाम भकतू , महाराष्ट्र चिफ विनय बोढे तसेच आई - वडील यांना दिले.
विजयी खेळाळूमधे  कु. सलोनी बादल समूदर - गोल्ड मेडल,  कु. वर्षा विलास तोटावार - गोल्ड मेडल,  कु. आचल गणपत अलोणे - गोल्ड मेडल, कु. कांचन छत्रपती बावणे - सिल्वर मेडल,  कु. स्नेहा संजीव नारनवरे - सिल्वर मेडल , कु. गायत्री संतोष झाडे - सिल्वर मेडल, अनिकेत भिवाजी हजारे - सिल्वर मेडल, यश संजय बामणकर - सिल्वर मेडल, वैभव देवराव कुबडे - सिल्वर मेडल, कु. श्रावणी किशोर पातर - ब्रांझ मेडल,  कु. कल्याणी विलास अलोणे - ब्रांझ मेडल, कु. अक्षता आनंदराव लांबाडे - ब्रांझ मेडल इत्यांदींचा समावेश आहे . 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos