महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरीच्या विद्यार्थिनींना सुयश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : नुकतेच बल्लारपूर जि.चंद्रपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२३-२४ मध्ये लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील दोन खेळाडू विद्यार्थिनींनी उत्तम खेळ खेळत सुयश प्राप्त केले.

भारतीय शालेय खेळ महासंघ तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील, बल्लारपूर येथे नुकतेच राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. देशभरातून सर्व राज्यातील खेळाडू विद्यार्थी येथे आले होते. भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील कु. लक्ष्मी राजू पुंगाटी व कु. चेतना मुंशी माडकामी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले होते. त्यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत झाली होती. यामध्ये १९ वर्षे मुली, ४ कि.मी. क्रॉस कंट्री धावणे या क्रीडा प्रकारात कु. लक्ष्मी पुंगाटी हिने देशातून सहावी आली. तर कु. चेतना माडकामी हिने १९ वर्षे वयोगटातून ३ कि.मी. चालणे या क्रीडा प्रकारात देशातून आठवा क्रमांक पटकावला.

जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दोन्ही मुलींचे कौतुक करून अभिनंदन केले. लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, मुख्याध्यापक श्रीराम झोडे, शाळेतील शिक्षक प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी दोन्ही खेळाडू मुली व क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांचे अभिनंदन केले. परिसरात त्यांचा कौतुक केल्या जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos