जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वीकारले दोन मुलींचे पालकत्व, खेळाडूंचा सत्कार


- आलापल्ली येथील किक बॉक्सिंग  स्पर्धकांचा  सत्कार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
नुकतेच गोंदिया येथे झालेल्या महाराष्ट्र किक बॉक्सिंग  स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सत्कार केला. तसेच आर्थिक मदत केली. तसेच आई वडील नसलेल्या व आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या दोन मुलींचे पालकत्व कंकडालवार यांनी स्वीकारले आहे. 
  अती दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलापल्ली येथील खेळाडूंनी किक बॉक्सिंग स्पर्धेत  चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकावला. त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.  या खेळाडूंची अजय  कंकडालवार यांनी   प्रशंसा केली.  सम्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शिक्षणा सोबतच खेळाचे महत्त्व किती असते हे प्रत्येक खेळाडू ना पटवून सांगितले . आपल्या क्षेत्रात खेळाडू आहेत पण त्यांना मार्गदर्शन , सोयी सुविधा व आर्थिक परिस्थिती नसल्याने आपला क्षेत्र मागे आहे.  त्यासाठी आपण पुरेपूर सहकार्य करू व आपल्या क्षेत्राचे नाव  देशात उंच करू  असे ते सांगितले. 
भामरागड तालुक्यातील  सोनाली मज्जी हिला आई - वडील नाहीत. तर एटापल्ली तालुक्यातील  रेश्मा कोरसा  हिची परिस्थिती  अंत्यत हलाखीची व गरीब आहे. त्यामुळे या दोन मुली शासकीय  वसतिगृहात राहून राणी दुर्गावती शाळा आलापल्ली येथे शिक्षण घेतात.  या मुलींची प्रतिभा पाहून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांनी   भविष्यात शिक्षण असो वा खेळ या प्रत्येक अडीअडचणी च्या वेळी मी तुमच्या सोबत आहे असे संबोधले आणि त्यांचे पालकत्व स्वीकारले.  त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा संपुर्ण खर्च देऊन आर्थिक मदत केली. प्रत्येक खेळाडू च्या मागे परिश्रम घेत त्यांना घडविलेले प्रशीक्षक  राहुल मेश्राम  व  रवी चरलावार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 येत्या २५ ऑगस्ट पासून राष्ट्रीय पातळी वरील स्पर्धा हैद्राबाद येथे होत आहे. या स्पर्धेसाठी  अनन्या सामलवार , दर्शन जेट्टीवार , यथार्थ शेळके , श्रुती कुलमेथे, कोमल कन्नाके,  मुग्धा दुलसे, सन्नी सलामे, अखिल आश्या, सोनाली मज्जी, रेश्मा कोरसा यांची निवड झाली आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos