वैनगंगा नदीला पूर, आष्टी - चंद्रपूर मार्ग बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी
: दोन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गोसेखूर्द धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे आष्टी - चंद्रपूर मार्ग बंद पडला आहे.
जिल्ह्यात पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भामरागडचा संपर्क काल सायंकाळपासून तुटला आहे. धानोरा तालुक्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. चामोर्शी - गडचिरोली, गडचिरोली - नागपूर, आरमोरी तालुक्यातील अनेक मार्ग बंद आहेत. काल १३ ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिस व महसूल विभागाच्या चमुने अनेकांचे प्राण वाचविले.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos