आजचे दिनविशेष
३ जानेवारी महत्वाच्या घटना
१४९६ : लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
१९२५ : बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
१९४७ : अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
१९५० : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
१९५२ : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
१९५७ : हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
२००४ : नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
३ जानेवारी जन्म
१८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च१८९७)
१९८८३ : इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)
१९२१ : हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै१९९७)
१९२२ : सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.
१९३१ : मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
३ जानेवारी मृत्यू
१९०३ : अॅडॉल्फ हिटलरचे वडील अॅलॉइस हिटलर यांचे निधन. (जन्म: ७ जून १८३७)
१९७५ : भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)
१९९४ : मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.
१९९८ : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)
२००० : स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
२००२ : भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)
२००५ : भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.
News - todayspecialdays