संगणक परिचालकांचे मानधन चार महिन्यांपासून रखडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहोचणारा माध्यम म्हणजे संगणक परिचालक .मात्र हा संगणक परिचालक आपल्या हक्काच्या मानधनापासून वंचित आहे.   कोरची तालुक्यातील संगणक परिचालकांच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला आहे. 
सविस्तर वृत्त असे की संगणक परिचालकांची नियुक्ती ही केंद्र शासनाच्या CSC या कंपनीकडून झालेली आहे. केंद्र चालकांचे  संपूर्ण वर्षाचे मानधन ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कंपनीला दिले जाते. त्यानंतर कंपनीकडून दर महिन्याला संगणक परिचालकांना मानधन देणे अपेक्षित असते. मात्र सद्यस्थितीला माहे एप्रिल पासून चे मानधन न झाल्याने संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी जोपर्यंत मानधन होणार नाही तोपर्यंत ऑनलाईन व ऑफलाइन काम बंद ठेवण्याचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना संगणक परिचालकांच्या वतीने देण्यात आले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos