पत्रकाराची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या - अहमदनगर येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अहमदनगर : 
दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. आज दुपारी घडलेल्या या घटेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दारुणकर हे सुमारे १५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खाली गोवा एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दारूणकर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली, याचा उलगडा होऊ शकला नाही.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-13


Related Photos