उद्या आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके गडचिरोलीत, स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /   गडचिरोली :
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे उद्या  बुधवार १४  ऑगस्ट   रोजी  सायंकाळी ७.३० वाजता गडचिरोली येथे येत आहेत. यावर्षीचा गडचिरोली जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांचे हस्ते होणार आहे.
१५  ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या  गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच गडचिरोली येथे   स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठीही  ते  उपस्थित राहणार आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos