पर्लकोटा नदीच्या पुलावर पुन्हा चढले पाणी, मार्ग बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
काही दिवस मोकळीक दिल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे भामरागडचा पुन्हा संपर्क तुटला आहे. आज सायंकाळच्या सुमारास पुलावरून पाणी चढल्याने वाहतूक बंद झाली आहे.
६ ऑगस्ट  पासून जवळपास ३ दिवस भामरागडमध्ये पुराचे पाणी होते. यामुळे जवळपास ३००  कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर भामरागड येथील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आज पुन्हा एकदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. दुपारी १ वाजतापासून नदीचा प्रवाह वाढण्यास सुरूवात झाली. सायंकाळी पाणी पुलावर चढले. आणखी पाणी वाढत असून पुन्हा भामरागडमध्ये पुराचे पाणी शिरण्याचा धोका आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos