महत्वाच्या बातम्या

 जिल्हयातील पेट्रोल, गॅस सिंलेडर व डिझेल पुरवठयाच्या दृष्ट्रीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील  पेट्रोल व गॅस सिंलेडर, डिझेल पुरवठयाच्या दृष्ट्रीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी आज आयोसिएल, बीपीसीएल, एचपीसीएल व भंडारा जिल्हा पेट्रोल असोसिएशन व एलपीजी फेडरेशन, भंडारा या संघटनांच्या प्रतिनींधीशी ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, अधिक्षक डोंगरे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पेट्रोल, डिझेल व गॅस डिलर असोशिएशनला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे बैठकीत जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले.इतर जिल्हयांच्या प्रशासनाच्या सोबत आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली.





  Print






News - Bhandara




Related Photos