रोवणीसाठी मजुर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली उलटली, तीन मजूर गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रॅक्टरला साईड न दिल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्राली उलटून झालेल्या अपघातात  तीन मजूर गंभीर जखमी जखमी झाल्याची घटना आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कोटगुल  - कोरची मार्गावर घडली आहे. या अपघातात अन्य काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. 
तालुका मुख्यालयापासून १२  किमी अंतरावर असलेल्या झगडवाही येथील मदीनाबाई हारामे याच्या छतीसगड राज्यातील वाडवी येथे शेतात रोवनी करण्यासाठी ट्रॅक्टरने  मजुर घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या आकाश ट्रॅव्हल्स ने अरुंद रस्त्यावर   ट्रॅक्टरला साईड दिले नाही.  
झगडवाही वरून ७ किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगड  राज्यातील  वाडवी येथील शेतात रोवणी  करण्यासाठी गावातील २०  मजुर     तयार करुन गावाशेजारी  असलेल्या गाहानेगाठा येथील रामदास कोसारे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ने  घेऊन जात असताना कोडगुल वरुन कोरची कडे सुसाट वेगाने येणाऱ्या आकाश ट्रॅव्हल्स ने ट्रॅक्टरला साईड दिले नाही.  यामुळे   अपघात घडला. अपघातात  अमीरा दिनेश हारमे (२२),  देवलाबाई जनूराम दररो (५५),  खुशाल राजेंद्र कमरो (२२)  हे तीन  मजुर गंभीर जखमी झाले.  तर सहा मजूर किरकोळ जखमी झाले आहेत . गंभीर जखमींना  कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार  करून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.  तर किरकोळ जखमींना  उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.  अधीक तपास कोरची पोलिस करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos