महत्वाच्या बातम्या

 भाजपा महिला आघाडीने केंद्र व राज्य शासन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी : सौ.योगीता पिपरे


- भाजपा महिला आघाडी गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वय आरमोरी विधानसभा क्षेत्र तालुका कुरखेडा, वडसा, आरमोरी येथे बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवा सुशासन व गरीब कल्याणकारी योजनांची माहिती भाजप महिला आघाडीने जनतेपर्यंत पोहोचावी तसेच प्रत्येक बुथ सक्षम करावे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका सौ. योगिता पिपरे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली-चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची बैठक भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका सौ.योगीता पिपरे यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष सौ. गीता हिंगे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, महिला आघाडी जिल्हा महामंत्री प्रिति शंभरकर, गडचिरोली शहर अध्यक्ष सौ.कविता उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा, वडसा, आरमोरी तालुक्यात बैठक संपन्न झाली.
यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकिसाठी महाविजय २०२४ ही मोहीम हाती घेऊन भाजपा महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान मोदीनी केलेल्या ९ वर्षाच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात यावी. तसेच महिला आघाडीने प्रत्येक बुथ सक्षम करावे. यावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला  कुरखेडा तालुक्यातील रुपाली कावळे, अरुणा गोण्णाडे, जागृती झोडे, सोनाबाई मडावी, अल्काताई गिरडकर, गीता गेडाम, दुर्गा गोटेफोडे, जयश्री मडावी, वडसा तालुक्यातील बेबीनंदा पाटील, शालु दंडवते, अश्विनी कांबळे, रोशनी पारधी, हेमा कावळे, मंगला शेंडे, अर्चना ढोरे आरमोरी तालुक्यातील गीता ढोरे, गीता सेलोकर, सुनीता चांदेवार, सुनीता मने तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos