मृतक पोलिस शिपाई केवळराम येलोरे यांच्या कुटुंबीयांना ३० लाखांची मदत


- पोलिस अधीक्षकांनी सुपूर्द केला धनादेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आरमोरी जवळ नाकाबंदीदरम्यान एका भरधाव वेगाने येणाऱ्या  वाहनाने जोरदार धडक दिल्याने आरमोरी पोलिस ठाण्यातील शिपाई केवळराम येलोरे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना आज १३  ऑगस्ट  रोजी ३०  लाखांच्या मदतीचा धनादेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.
मृतक पोलिस शिपाई केवळराम येलोरे यांचे पगार खाते गडचिरोली येथील ॲक्सीस बॅंकेच्या शाखेत होते. त्यांना तत्काळ ३०  लाख रूपये मिळावेत यासाठीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार तयार करून ॲक्सीस बॅंकेकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करून आज ॲक्सीस  बॅंकेतर्फे ३०  लाख रूपयांचा धनादेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, ॲक्सीस बॅंकेचे नागपूर सर्कल प्रमुख श्रृष्टी रंजन नंदा, शैलेश देशमुख यांच्याहस्ते केवळराम येलोरे यांच्या पत्नी प्रिती येलोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, ॲक्सीस  बॅंकेचे शाखा प्रमुख अभिजीत डाबिर, उपव्यवस्थापक राकेश वल्लालवार, ग्राहक सेवा अधिकारी नितेश मळई तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos