मावस भाऊ आणि बहिणीने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या - आंबेगाव तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : 
आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मावस भाऊ आणि बहिणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.ही घटना मंगळवारी आज
पहाटे घडली.या घटनेने खळबळ उडाली असुन आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भागातील खडकी गावठाणानजीक स्मशानभुमीजवळ असणाऱ्या एका विहिरीत नात्याने मावस बहीण भाऊ असणाऱ्या अक्षय अशोक जाधव ( वय २४ ) आणि ऋतुजा उत्तम तट्टु (वय १९)  या दोघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दोघे बहीण भाऊ शेजारी शेजारी राहत होते. मुलगा अक्षय याचे वडील मयत असून तो मूळचा राजूरी येथील आहे. आई माहेरी येवून राहत होती. खडकी गावातील ऋतुजा उत्तम तट्टु ही मुलगी मंगळवारी पहाटे ३ वाजता घरातुन बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडील उत्तम तट्टु यांनी मंचर पोलिसांना आज सकाळी दिली. त्यानंतर मंचर पोलिसांनी ऋतुजा तट्टु हिचा शोध सुरू केला. खडकी येथील पोलिस पाटील मंगल पोखरकर यांनी खडकी स्मशान भुमीजवळील धोंडिभाऊ हरिभाऊ पोखरकर यांच्या विहिरीत एक तरुण आणि तरुणीचा मृतदेह दिसत असल्याचे पोलिसांना कळविले. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे ,पोलिस कर्मचारी राजेंद्र हिले,विनोद गायकवाड,सुनिल शिंदे,दिनेश माताडे, गणेश तेली  यांनी घटनास्थळी जावुन विहिरीत पाहिले असता तेथे ओढणीने एकमेकांना बांधुन आत्महत्या केल्याचे दिसुन आले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास भागवत यांनी दोघांचे शवविच्छेदन केले. मृतदेह नातेवाईक ताब्यात देण्यात आले आहेत. अक्षय जाधव आणि ऋतुजा तट्टु या दोघांनी नेमकी आत्महत्या का केली.याचा शोध मंचर पोलिस घेत आहे.पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले तपास सुरू केला आहे . उदया नातेवाईकांकडे चर्चा करणार आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-13


Related Photos