महत्वाच्या बातम्या

 पेट्रोल व डिझेल पंप मध्यरात्रीपासून ड्राय : इंधनाचा मोजकाच साठा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्राच्या मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारल्याने नागपूर जिल्ह्यातील १६३ पंपांवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पेट्रोल आणि डिझेल पोहोचले नाही. त्यामुळे मध्यरात्रीपासून ९० टक्के पंप ड्राय झाले आहेत. त्यामुळे स्थिती गंभीर झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या वृत्ताने पंपावर सोमवार १ जानेवारीला सायंकाळपासून वाहनचालकांच्या लांब रांगा लागल्या. 

ट्रकचालकांसह टँकरचालकांचेही आंदोलन अनिश्चितकाळासाठी आहे. आंदोलनावर तोडगा निघाल्यास पंपांवर पेट्रोल आणि डिझेल येईल, अन्यथा मंगळवारी वाहनचालकांना इंधन मिळणार नाही. शिवाय या गंभीर समस्येचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण होईल, असे पंपचालक म्हणाले.





  Print






News - Nagpur




Related Photos