कोल्हापूरात जीवनावश्यक खाद्य पदार्थांवर जादा किंमत आकारलेल्या तीन एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोल्हापूर :
जादा किंमत घेऊन पाणी व केळ्याचे चिप्स विक्री केलेल्या जिल्ह्यातील तीन एजन्सींवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र यांच्याकडून देण्यात आली.
जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना, काही एजन्सींकडून जीवनाश्यक वस्तूंच्या खाद्य पदार्थ जादा किंमत आकारून विकल्या. यामध्ये श्रीकांत इंडस्ट्रीज श्रीकृष्ण कॉलनी कळंबा कोल्हापूर यांनी एक्वामी पॅकेज केलेल्या 20 लिटर पाण्याच्या 2 नगांची किंमत 75 रुपये एवढी घेतली असून, श्री एजन्सीज अँड बेकर्स रेसकोर्स नाका, संभाजीनगर कोल्हापूर यांनी रॉयल केळी चिप्सच्या एका नगाला 320 रुपयाने विकल्या, तर सुप्रिम फूडस, सितालक्ष्मी नगर कोईमतूर यांनीही रॉयल केळी चिप्सच्या एका नगाला 320 रुपये घेतले.
वरील तिन्ही एजन्सींवर भंग कलम नियम 18 (1) नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिली.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-13


Related Photos