राजीव गांधी विदयार्थी अपघात योजनेचे अनुदान तत्काळ दया - जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
विदयार्थ्याचा अपघात होऊन मुत्यूमुखी पडल्यास किंवा त्याच्या शरीराचा एक अवयव निकामी झाल्यास अपघातग्रस्त विदयार्थ्यांच्या कुटूंबियांना  राजीव गांधी  विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून मिळणारे अनुदान तत्काळ वितरीत करावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फतीने  जिल्हयातील ७ लाख ८० हजार रूपयाचे ११ दाव्यांना जिल्हाधिकारी यांनी नुकतीच मंजुरी दिली असून तत्काळ अनुदान वाटप करण्यात येणार आहे. राजीव गांधी  विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून विदयार्थ्याचा अपघात होऊन तो मुत्यूमुखी पडल्यास किंवा अपघातात शरीराचा एक अवयव निकामी झाल्यास वर्ग १ ते १२ मधील विदयार्थ्यांच्या कुटूंबियांना ७५ हजार व ३० हजार रूपये सानुग्रह अनुदान दिल्या जातो. परंतु सदर घटना घडल्यानंतर सानुग्रह अनुदानासाठी तयार करण्यात येणार प्रस्ताव सादर करण्यास विलंब होतात. सदर योजनेबाबत प्रस्ताव विलंबाने सादर झाल्यास लाभ देण्यास उशिर होतो. त्यामुळे सदर विदयार्थ्यांच्या कुटूंबियांना  आर्थीक अडचणीचा सामना करावा लागतो. भंडारा जिल्हयातील ७ लाख ८० हजार रूपयाचे ११ दाव्यांना  जिल्हाधिकारी यांनी, नुकतीच सानुग्रह अनुदान वाटपास मंजूरी दिली आहे. या मध्ये जिल्हयातील भंडारा, मोहाडी, लाखांदूर, पवनी व लाखनी पंचायत समिती अंतर्गत दाव्यांचा समावेश आहे. सदर योजनेच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान मिळविण्याबाबतचे प्रस्ताव विलंबाने सादर होवू नयेत, सादर झालेल्या प्रस्तावात त्रुटया आढळून आल्यास त्यानिकाली काढून राजीव गांधी विदयार्थी अपघात योजनेचे अनुदान तत्काळ वितरीत करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी,प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना केलेल्या आहेत. विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्यास याची जबाबदारी निश्चित करून संबंधीतांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असा कडक इशारा जिल्हाधिकारी डॉ. गिते यांनी दिला.
नुकत्याच ७ लाख ८० हजार रूपयाचे राजीव गांधी विदयार्थी अपघात अनुदान योजनेच्या ११ दाव्यांना‍ जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असून सदर विदयार्थ्यांच्या कुटूंबियांना तत्काळ लाभ देण्यात येणार आहे. परंतु सदर १ दाव्यांबाबत  अनुदान वितरणाचे प्रस्ताव उशिर होऊन अनुदान वाटपास विलंब का झाला, याबाबत संबंधीतांवर जाबाबदारी निश्चित करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांना केल्या आहेत. यापुढे राजीव गांधी विदयार्थी अपघात योजनेचे माध्यमातून अपघातग्रस्त विदयार्थ्यांच्या कुटूंबियांपर्यंत तत्काळ पोहचविण्यात यावी, प्रस्ताव सादर करण्यास उशिर होत असेल तर याची खबरदारी घेण्यात यावी. प्रस्तावात त्रुटया आढळून आल्यास त्या त्वरित निकाली काढावे  व अपघातग्रस्त विदयार्थ्यांच्या कुटूंबियांना राजीव गांधी विदयार्थी अपघात योजनेच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान पोहचविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-13


Related Photos