महत्वाच्या बातम्या

 ३ ते १२ जानेवारी दरम्यान महिला हक्क जाणीव जागृती पर्वाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : बार्टी उपकेंद्रा मार्फत महिला हक्क जाणीव जागृती पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 जानेवारी 2024 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्यांच्या स्मृती पित्यर्थ या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी घरा घरात शिक्षणाची ज्योत पेटवून क्रांती केली. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. महिलांसाठी प्रेरणादायी असलेल्या या दोन्ही स्त्रीशक्तीच्या स्मृतीपित्यर्थ नागपुरातील विविध ठिकाणी महिलांचा न्याय हक्काचा जागर करण्याचे योजिले आहे.

3 डिसेंबर रोजी तिरपुडे नर्सिंग कॉलेज येथे या जागृती पर्वाची सुरवात होणार आहे. त्यानंतर श्रद्धानंद अनाथालय आधारगृह, भारतीय आदिम जाती सेवक संघ, करूणा महिला वसतीगृह, नारा झोपडपट्टी, प्रियदर्शी महिला वसतीगृह, वारांगणा वस्ती इतवारी येथे जिल्हासेवा प्राधिकरण, महिला व बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, आरसेटी, टाटा स्ट्राईव्ह, इंडो जर्मन टुल या विभागातील अधिकारी तसेच तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्यविषयक, कायदेविषयक तसेच रोजगार विषयक योजनंची माहिती देण्यात येणार आहे.

महिला हक्क जाणीव जागृती पर्वाची सांगता 12 डिसेंबर रोजी राहटेनगर टोली येथे करण्यात येणार आहे. या पर्वात अधिकाधिक महिलांना सामील होण्याचे आवाहन बार्टी उपकेंद्र नागपूर मार्फत करण्यात येत आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos