श्रीनगरची जबाबदारी सांभाळतात या दोन महिला अधिकारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. मात्र या तणावाच्या स्थितीतही दोन महिला अधिकारी समर्थपणे श्रीनगरची जबाबदारी सांभाळत आहेत. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित राज्याचा दर्जा मिळाला आणि आयएएस अधिकारी डॉ. सईद सहरीश असगर यांच्यावर नवीन जबाबदारी येऊन पडली. जम्मू काश्मीर राज्याची माहिती संचालिका म्हणून त्यांची श्रीनगर येथे नियुक्ती करण्यात आली. सरकारच्या योजना आणि सरकारचे निर्णय नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या अगदी चोख पार पाडतायेत. तर , एकीकडे आयपीएस अधिकारी पी के नित्या यांच्यावर राम मुंशी बाग ते हरवन गावांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पी के नित्या यांना ज्या परिसरात तैनात करण्यात आलं आहे तिथं सरकारनं ताब्यात घेतलेल्या व्हिआयपींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच अनेक नेत्यांची घरे या भागात आहेत. काश्मीर खोऱ्यात तैनात केलेल्या असगर आणि नित्या या दोन महिला अधिकारी आहेत. 
कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच सरकारनं नागरिकांसाठी फोन बूथ पासून अनेक जीवनावश्यक सामानाची तरतूद केली आहे. जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर चार दिवसांतच सईद असगर यांना श्रीनगरमध्ये माहिती संचालिका म्हणून नियुक्त करण्यात आलं. सरकारच्या योजनांनबाबत नागरिकांना जागरूक करण्याचं काम त्या करत होत्या. गेल्या आठ दिवसांपासून त्या लोकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. मात्र, आता त्यांचं काम बदलण्यात आलं आहे. आपत्ती व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.
असगर यांना एक वर्षांचा मुलगा आहे. असगर एमबीबीएस असून काही वर्षा त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रॅक्टीस केली आहे. 'डॉक्टर म्हणून मी रुग्णांवर उपचार करायचे. आता काश्मीर खोऱ्यात वेगळी आव्हानं आहेत. या आव्हानांना हाताळताना कठोरपणाबरोबरच कधी कधी भावनिक होणंही गरजेचं आहे.' असं त्या म्हणतात. असगर यांचे पती पुलवामामध्ये कमिश्नर या पदावर कार्यरत आहेत. 

   Print


News - World | Posted : 2019-08-13


Related Photos