महत्वाच्या बातम्या

 मातोश्री वृद्धाश्रमात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा क्षयरोग केंद्र व आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृध्दाश्रम येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी व आसीएमआरचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मातृसेवा संघ मातोश्री वृध्दाश्रमाच्या अध्यक्ष पुष्पमाला देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी ए.एस. खोब्रागडे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे डॉ. हेमंत पाटील, आरोग्य सहाय्यक सुमंत ढोबळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजू सोनटक्के, साधना कोसारे, वैभव मेघरे, आयसीएमआरचे डॉ. आरविंद प्रधान, सोनू नागवंशी, सतिश राऊत, मातोश्री वृध्दाश्रमाचे कर्मचारी उपस्थित होते.

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम शिबिरात संशयित क्षयरुग्णांची तपासणी तसेच हॅन्ड डिजीटल एक्स-रे मशीनद्वारे वृध्दाचे डिजिटल एक्स-रे तपासणी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान क्षयरोगाबाबत लाभार्थ्यांना माहिती, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, निदान झाल्यानंतर दिले जाणारे उपचार याबाबत माहिती देण्यात आली. या सर्व आजाराचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos