खोब्रागडी नदीत चुरमुरा येथील इसम वाहून गेला , पोलीस प्रशासनाची शोधमोहीम सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुका मुख्यालयापासून पासुन १० किमी अंतरावर असलेल्या चुरमुरा येथिल रहिवासी गोवर्धन भगवान रामटेके (४९) हे  काल १२ ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते साडेसहा वाजता ठाणेगाव - देऊळगाव दरम्यान असलेल्या खोब्रागडी नदीवरील पुलावरून वाहून गेले. दरम्यान पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनेची चौकशी केली व बेपत्ता रामटेके यांचा शोध नदीप्रवाहात करणे सुरू आहे. अद्यापपर्यंत रामटेके यांच्या जीवित किंवा मृत शरीराचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे ते वाहून गेले असावे व त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी व चुरमुरा येथिल रामटेके यांच्या घरी आरमोरी चे तहसिलदार कल्याणकुमार दहाट यांनी भेट दिली आहे व पोलीस प्रशासनानेही चौकशी केली आहे. गडचिरोली येथील आपत्ती व्यवस्थापनाची चमू शोधात आहे. 
प्राप्त माहितीनुसार गोवर्धन भगवान रामटेके हे पेशाने डॉक्टर असुन आजुबाजूच्या परिसरातील खेडेगावात रूग्ण शोधायचे व त्यांचा उपचार करायचे. त्यांचा मुक्काम ठरलेला नसायचा. काल ते आरमोरी येथे मुक्कामी होते. आज सकाळी आरमोरी वरून आपल्या दुचाकीने येताना त्यांचा नियंत्रण सुटून खोब्रागडी नदीवरील पुलावरील तुटलेल्या कठड्यावर धडक दिली व ते नदीत उसळून वाहत गेले. रामटेके यांना अती मद्यपानाची सवय होती.  त्यामुळे हा अपघात झाला असावा असे गावकऱ्यांत  बोलल्या जात आहे.  गोवर्धन यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबात पत्नी, दोन मुले, आई, बहिन असा परिवार आहे.  वृत्त लिहीत पर्यंत शोध मोहीम चालू होती

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos