महत्वाच्या बातम्या

 एकपाळा येथील श्री. हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला खासदार रामदास तडस यांचा सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : विश्वात शांतता नांदो, सर्वच जीवांचे कल्याण होवो, समाजात सर्वत्र सद्भाव व सहकार्य वाढो यासाठी श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवळी तालुक्यातील प्रसिध्द एकपाळा येथील श्री. हनुमान मंदीरात सामुहिन हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्रकाश कारोटकर, शरद आमदने, रमेश सातपुते, श्याम घोडे, गणेश लाडेकर, गोल्डी बग्गा, दिनेश क्षिरसागर, संजय कामडी, गजानन महल्ले, किसना उगेमुगे, रवी कारोटकर, प्रविण तेलरांधे, मंगेश शेंडे, दिलीप खाडे, दिवाकर झाडे, महादेव कामडी, उमेश कामडी, सौरभ कडु उपस्थित होते.

एकपाळा हनुमान देवस्थान माझे आराध्य आहे, या ठिकाणी आल्याशिवाय मी कोणत्याही कामाची सुरवात करीत नाही, श्री. हनुमान म्हणजे बुध्दीची शक्तीची देवता आहे, त्यामुळे फक्त एकच देव आहे, की, ज्याचे मंदीर प्रत्येक गावात, प्रत्येक वार्डात आहे, त्यांची आराधना प्रत्येक व्यक्ती करीत असतो, आज नविन वर्षानिमीत्य विश्वास शांतता, सर्वच जीवांचे कल्याण होवो, समाजात सर्वत्र सद्भाव व एकमेकांना सहकार्य वाढण्यासाठी हनुमान चालीसाचे सामुहिक पठण करण्यात आले, या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात सहभाग घेऊन एक वेगळी अनुभूती प्राप्त झाली असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - Wardha




Related Photos