धम्म प्रभास बुद्ध विहार परिसरात वृक्षारोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
येथील गौतम वार्डातील धम्म प्रभास बुद्ध विहार परिसरात  मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
बुद्ध विहार परिसरात कडुलिंब, करंजी, पाम,अशोका, आवळा, आंबा, बकुल, रेन ट्री, स्पतोडीया, विद्या , चांपा, फणस, थायकस असे फळ झाडासह अनेक प्रकारच्या  झाडांची लागवड करण्यात आली.  वृक्षारोपण कार्यक्रम माजी सभापती सुनील जीवनतारे यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश अवसरे, महादेव शिवरकर , विहार समितीचे अध्यक्ष ईश्वर सोमकुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
वृक्षारोपण कार्यक्रमाला धम्म प्रभास बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष ईश्वर सोमकुवर, उपाध्यक्ष शशीकांत गजभिये, सचिव डॉ प्रशांत बनकर, कोषाध्यक्ष डी जी भांदककर, मनोहर शेंडे,  भिमराव गणवीर, सुमेर गजभिये, डॉ शिवशंकर बनकर, एस एस श्रीरामे,  शाशीबाई बनकर,  सविता गणवीर,  वर्षा गजभिये , विभा गजभिये, धर्मदास भांबोरे, नाना रामटेके आदी उपस्थित होते.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-08-12


Related Photos