मा दंतेश्वरी दवाखान्यात रक्तदान शिबीर , ३३ जणांनी केले रक्तदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सर्च येथील मा दंतेश्वरी दवाखान्यात निर्माण शिबिरांतर्गत शनिवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण ३३ जणांनी रक्तदान केले. 
सर्च(शोधग्राम) येथे ३ ते ११ ऑगस्ट दरम्यान निर्माण शिबीर आयोजित होते. या शिबिर्रांतर्गत शनिवार १० ऑगस्ट रोजी येथील मा दंतेश्वरी दवाखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण ३३ जणांनी रक्तदान केले. यामध्ये निर्माणी युवा आणि शोधग्राम मधील रहिवाशांनी सहभाग घेतला. सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अंजली साखरे यांच्या मार्गदर्शनात सतीश तडकलावार, नरेश कुंदुकुरीवार, योगिता काटेंगे आणि प्रमोद देशमुख या रक्तपेढीतील चमूने रक्तसंकलन केले. दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव तातावार, डॉ. दत्ता भलावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रवींद भुसारी, संजय दरडमारे यांनी शिबिराचे नियोजन केले. शिबिरासाठी निर्माण चमूने सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-12


Related Photos