विशाखपट्टणममध्ये कोस्टगार्डच्या बोटीला आग : क्रू मेंबर्सच्या समुद्रात उड्या, एक जण बेपत्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
विशाखापट्ट्णमधील समुद्रात उभ्या असलेल्या तटरक्षक दलाच्या बोटीला (Coast Guard) भीषण आग लागली आहे. या बोटीत २९ क्रू मेंबर्स सांगण्यात येत आहे. त्यातील २८ जणांना वाचवण्यात यश आलं असून १ जण अद्याप बेपत्ता आहे. या बोटीला आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
कोस्टगार्डच्या कोस्टल जॅग्वार नावाच्या  बोटीला सकाळी ११. ३० च्या सुमारास आग लागली. या बोटीत सुरुवातीला मोठा स्फोट झाला. त्यामुळे बोटीमध्ये असलेल्यांना शॉट सर्किट झालं असावं असे वाटले. मात्र स्फोटाच्या आवाजाने बोटीला हादरा बसला. त्यानंतर आग लागली अशी माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण होती की, बोटीमधील क्रू मेंबर्सने जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच, कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर सी ४३२ ही घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच बोटीमधून उड्या मारलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी ट्यूब आणि रस्सी फेकण्यात आल्या.
या बोटीत २९ जण होते. त्यातील २८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र बोटीतील एक जण अद्याप बेपत्ता असून त्याला शोधण्याचे बचावकार्य सुरु आहे.  Print


News - World | Posted : 2019-08-12


Related Photos