दबंग गर्ल बबिता फोगाट चा वडील महावीर फोगाटसह भाजपमध्ये प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चंदीगड :
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. दंगल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुस्टीपटू बबिता फोगाटने आपले वडील महावीर फोगाट  यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आधी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला  धक्का बसला आहे.
महावीर फोगाट याआधी जेजेपीत होते.आज १२ ऑगस्ट रोजी त्यांनी जेपीपीला रामराम करुन केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केला. यावेळी भाजप नेते अनिल जैन, रामविलास शर्मा आणि अनिल बलूनी हे देखील उपस्थित होते. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत बबिता फोगाटला भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
कलम ३७० नुसार असलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर बबिता फोगाटने भाजप सरकारची प्रशंसा केली होती. तिने भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक भाषण देखील रिट्वीट केले होते. यात शाह यांनी कलम ३७० हटवण्याबाबत आपल्या मनात कोणताही संभ्रम नव्हता असं म्हटलं होतं. शाह यात म्हणाले होते, “कलम ३७० मुळे देश आणि काश्मीरचं काहीही चांगलं झालं नाही. हे कलम खूप अगोदरच हटवायला हवे होते. हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद संपेल आणि काश्मीर विकासाच्या दिशेने पुढे जाईल.
बबिता फोगाटने यापूर्वी तिला मिळालेल्या हरियाणा पोलीस विभागातील निरिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. महावीर फोगाट हे यापूर्वी जेजेपीमध्ये स्पोर्ट विंगचे काम पाहत होते.

 
  Print


News - World | Posted : 2019-08-12


Related Photos