जम्मू कश्मीर मुस्लिम बहुल राज्य असल्यामुळे ३७० हटवले : पी. चिदंबरम यांचे वादग्रस्त वक्तव्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चेन्नई :
जम्मू कश्मीर हे मुस्लिम बहुसंख्याक राज्य असल्यामुळे केंद्र सरकारने कलम ३७० हटवले आहे असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे माजी केंद्रिय मंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे. चेन्नईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
चिदंबरम म्हणाले की, ' जम्मू कश्मीर हे जर हिंदू बहुल राज्य असते तर भाजप या राज्याच्या विशेष दर्जा काढून घेतला नसता. परंतु जम्मू कश्मीर हे मुस्लिम बहुल राज्य राज्य आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्याच्या विशेष दर्जा काढला आहे.'
केंद्र सरकारने जम्मू कश्मीर संदर्भात कलम ३७० आणि ३४ अ काढून टाकले आहे. सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयकही मंजूर केले आहे. त्यानुसार जम्मू कश्मीर आणि लडाख हे केंद्र शासित प्रदेश घोषित करण्यात आले आहेत.  Print


News - World | Posted : 2019-08-12


Related Photos