ईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाठविलेली मिठाई पाकिस्तानने नाकारली


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  भारत-पाकिस्तान संबंधात सध्या कमालीचा तणाव निर्माण झालेला असला तरी भारतीय सैन्याने आपली परंपरा सोडलेली नाही. आजच्या ईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाकिस्तानला मिठाईचा पुडा देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने   मिठाई स्वीकारण्यास नकार दिला. 
 सणांच्यावेळी सीमेवरती तैनात असणारे सैन्याचे अधिकारी परस्परांना मिठाई देऊन शुभेच्छा देतात. सीमेवर सौहार्दाचे वातावरण रहावे. नात्यातील कटुता संपुष्टात यावी हा हेतू त्यामागे असतो. आज ईदच्या निमित्ताने भारताने परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने मिठाई नाकारुन कटुता आणखी वाढवली.
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने आदळआपट सुरु आहे. भारताबरोबर सर्व प्रकारचे संबंध तोडण्यापर्यंतचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. आक्रमकतेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानकडून युद्धाचे इशारे दिले जात आहेत. 
भारताबरोबर व्यापारी संबंध स्थगित करण्याचा पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारचा निर्णय आता त्यांना स्वत:च्याच पायावर धोंडा मारुन घेतल्यासारखा वाटू लागला आहे. या निर्णयानंतर भारतामधील आयातीवर आधारित उद्योगांमधील कामगारांचा रोजगार बंद झाला आहे. तसेच भारतातून पाकिस्तानात आयात होणाऱ्या कांदा, टोमॅटोसारख्या गोष्टी बंद झाल्याने गरजेच्या वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. एका वृत्तानुसार नेहमी ईदच्या आधी बाजारांमध्ये असणारा उत्साह यंदा कमी असल्याचे पहायला मिळत आहे. 
  Print


News - World | Posted : 2019-08-12


Related Photos